नाशिकमधील सिटीलिंक बसचे कर्मचारी संपावर

नाशिकमधील सिटीलिंक बसचे कर्मचारी संपावर

नाशिक महानगर पालिकेच्या सिटीलिंक बसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मागील तीन महिन्यांपासून पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शहरातील बससेवा ठप्प झाली असून नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.

नाशकात मोठ्या उत्साहात पालिकेने सिटीलिंक बस रस्त्यावर उतरवली होती. तर पालिकेने अनेक बसदेखील नव्याने खरेदी केल्या आणि अल्पवधीतच सिटीलिंक बस नाशिककरांची लाइफलाइन बनली. मात्र, असे असताना दुसरीकडे सिटीलिंक बसविरोधात कर्मचारीच आंदोलन करत आहेत. पगार वेळेत होत नसल्याची तक्रार सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. याआधीही सिटीलिंकचे कर्मचारी पगार वेळेत होत नसल्याने संपावर गेले होते. त्यानंतर आता पुन्ही गेल्या तीन महिन्यांपासून पगार थकित केल्याने तसेच दिवाळीचा बोनसही न दिल्याने कर्मचारी पुन्हा संपावर गेले आहेत.

नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल

नाशिक पालिकेच्या सिटीलिंक बसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सिटीलिंक बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे या संपाचा फटका प्रवाशांना बसत आहे. दररोज अनेक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी सिटीबसने प्रवास करतात. मोठ्या संख्येने प्रवाशी सिटीबसने प्रवास करतात. मात्र, गुरुवारी सकाळपासून रस्त्यावर एकही सिटीबस धावलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version