वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

कल्याण, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : कल्याण शिळफाट्यावरील पलावा जंक्शनजवळील वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, या सर्वाला सर्वस्व यंत्रणा जबाबदार असल्याचे म्हंटले जात आहे. येथील पुलाचे काम अजूनही अर्धवट अवस्थेतच आहे. त्यामुळे यातून एमएमआरडीए, एमएसआरडीसी, केडीएमसी यांचा एकमेकांशी समन्वय नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे पुलाखाली असणारे वाईन शॉप, अनधिकृत टपऱ्या हटवा अशा आशयाचे पत्र अनेकदा आयुक्तांना दिले गेले असूनही यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाल्याचे दिसत नाही. तसेच पुलाच्या खालून जाणाऱ्या गॅस लाईनवर आलेल्या पिलरमुळे अनेक समस्या निर्माण होत असून यावर तोडगा कधी निघणं हा प्रश्न अजूनही निर्णायकच आहे. परिणामी होणाऱ्या वाहतूक कोंडीला प्रवशांना सामोरे जावे लागत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version