तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांना आणखी एक धक्का

तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांना आणखी एक धक्का

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या अनेक वर्षापासुन तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांना आणखी एक धक्का बसलाय. सानपाडा येथील met साठी घेतलेला भूखंड परत करण्याचे आदेश सिडकोचे  दिलेत.

करोडो रुपये किमतीचा हा भूखंड महाविद्यालय बांधण्यासाठी सन 2003 मध्ये  कवडीमोल किमतीने घेतला होता. मात्र, 2003 ते 2018 या पंधरा वर्षाच्या कालावधीत कोणतंही बांधकाम झालं नाही त्यामुळे सिडकोनं भूखंड परत करण्याचे आदेश दिलेत. 

भूखंड घेतल्यानंतर दोन वर्षात बांधकामाला सुरवात करणं बंधनकारक असताना ही पंधरा वर्ष कोणतंच बांधकाम झालं नाही  बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचं कारण दाखवत सिडकोवर भुजबळ कुटुंबीय दबाव टाकत असल्याचा आरोपअंजली दमानिया यांनी केला होता. या कालावधीत संस्थेकडे करोडो रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे पुरावे अंजली दमानिया यांनी सिडकोला देत कारवाई करण्यासाठी दमानिया यांनी केला होता पत्रव्यवहार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version