तब्बल 21 वर्षांनंतर भारत-चीन आमने-सामने!

तब्बल 21 वर्षांनंतर भारत-चीन आमने-सामने!

भारत आणि चीन दोन दशकांनंतर आमने सामने लढले. पण ही लढाई होती फुटबॉलच्या मैदानावर. भारत आणि चीनचे फुटबॉलपटू 21 वर्षांनंतर एकमेकांसोबत फुटबॉल खेळले. सुझाऊ येथे झालेल्या या मैत्रीपूर्ण सामन्यात भारताने चीनचा एकही गोल होऊ दिला नाही त्यामुळे हा सामना ‘ड्रॉ’ झाला.

हा विशेष सामना पाहाण्यासाठी स्टेडिअममध्ये लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. अटीतटीच्या या सामन्याचा फर्स्ट-हाफमध्ये एकही गोल झाला नाही. भारतीय कॅप्टन संदेश झिंगनने फर्स्ट हाफमध्ये तर गुरप्रीतसिंग संधूने सेकंड हाफमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळेच चीनसारख्या तगड्या प्रतिस्पर्धी संघाशी सामना ड्रॉ झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version