नाशिकमधील रुग्णालयाच्या धक्कादायक वास्तवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिकमधील रुग्णालयाच्या धक्कादायक वास्तवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बाल विभागातील कारभार जय महाराष्ट्रनं समोर आणल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.

 

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

 

सरकार आणि प्रशासन यांचं समन्वय नसल्यामुळे गेल्या पाच महिन्यात एकशे पंच्यांशी बालकांचा मृत्यू झाला. तर, कुपोषण मुक्त महाराष्ट्र ही सरकारची घोषणा फोल ठरलीय अशी खरमरीत टीका चित्रा वाघ यांनी सरकारवर केली. तर, बालमृत्यूचे मूळ कारण कुपोषण असून संबंधित मंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा वाघ यांनी सरकारला दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version