चित्रा वाघ यांची ‘या’ प्रकरणी चौकशी होणार?

चित्रा वाघ यांची ‘या’ प्रकरणी चौकशी होणार?

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणी चित्रा वाघ यांची पुणे पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने ईमेलद्वारे राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. रघुनाथ कुचिक हे जामिनावर असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. मात्र, चित्रा वाघ या गुन्ह्याबाबत खोटी माहिती देत अपमानजनक टीका करत आहेत. त्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी होत असल्याचे राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांची भेट घेत त्यांनी रघुनाथ कुचिक प्रकरणी चित्रा वाघ यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता चित्रा वाघ यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ वर्षीय तुरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तुरणीशी शारिरीक संबंध ठेवून तिला गरोदर करण्यात आले. त्यानंतर त्या तरुणीचे गर्भपात करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्या तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीमध्ये हा प्रकार ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुणे, गोवा याठिकाणी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. त्यानुसार, कुचिक यांच्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version