…म्हणून चायनीज विक्रेत्यानं ग्राहकाच्या अंगावर उकळते तेल फेकले

…म्हणून चायनीज विक्रेत्यानं ग्राहकाच्या अंगावर उकळते तेल फेकले

जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर

 

उल्हासनगरमध्ये चायनीज विक्रेत्यानं रागाच्या भरात ग्राहकावर उकळत तेल फेकल्याची घटना समोर आलीय. पदार्थ नीट न केल्याचा जाब विचारल्याने विक्रेत्याला संताप अनावर झाला. अन् त्याने चक्क उकळते तेल ग्राहकाच्या अंगावर फेकले.

उल्हासनगरमध्ये व्हिनस चौकातील मनोज कोळीवाडा या चायनीजच्या दुकानात मंगळवारी रात्री 12 वाजता ही घटना घडली. चायनीज पदार्थ नीट न केल्याचा जाब ग्राहकानं विचारल्यावर दुकानदारानं त्यांना मारहाण केली. मारहाणीनंतर ग्राहकाचा मोठा भाऊ दीपक म्हस्के चायनीज स्टॉलवर आला आणि त्याने भावाला मारहाण केल्याचा जाब विचारला.

त्यावेळी चायनीज विक्रेत्यानं त्याच्या अंगावर चक्क उकळतं केलं फेकले. हा सर्व प्रकार जवळील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला असून जखमी दीपक म्हस्केवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version