Chinchpokli Chintamani: ‘सुंदर निरागस हे रूप तुझे…’ चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; बाप्पाच्या मनमोहक रूपाची सर्वत्र चर्चा

मुंबईतील प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्याला आज सुरुवात झाली आहे.
Chinchpokli Chintamani: ‘सुंदर निरागस हे रूप तुझे…’ चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; बाप्पाच्या मनमोहक रूपाची सर्वत्र चर्चा

महाराष्ट्रात गणेशोत्सवाची चाहूल लागली असून विविध ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच मुंबईतील मानाचा आणि सर्वात जुन्या गणपती मंडळांपैकी एक असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्याची आज सुरुवात होत आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईतील गणेशभक्तांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असून दरवर्षी बाप्पाच्या आगमन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक आणि गणेशभक्त उपस्थित राहतात.

यंदाही चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनासाठी मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वीच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ढोल-ताशा पथकांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर गणेशमय झाला आहे. दरम्यान, आज होणाऱ्या आगमन सोहळ्यापूर्वी चिंतामणी बाप्पाचे काही खास फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये बाप्पाचे मनमोहक रूप पाहायला मिळत असून गणेशभक्तांमध्ये या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि आगमन सोहळ्याचा आनंद अनुभवण्यासाठी भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version