गोरखपूरमध्ये बालमृत्यूचे ‘तांडव’ !

गोरखपूरमध्ये बालमृत्यूचे ‘तांडव’ !

जय महाराष्ट्र न्यूज, गोरखपूर

 

गोरखपुरमध्ये पुन्हा एकदा बालमृत्युचे तांडव सुरु आहे. गेल्या 48 तासांत 42 बालकांच्या मृत्युची खळबळजनक घटना घडली आहे. गोरखपूरच्या बाबा राघव दास रुग्णालयाचे प्राध्यापक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने 70 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता.

आता त्याच गोरखपूरमध्ये पुन्हा एकदा ४८ तासांमध्ये 42 बालकांचा विविध आजारांमुळे मृत्यू झाला आहे. मेंदूचे विकार, न्युमोनिया, जंतू संसर्ग आणि नवजात बालकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या जीवघेण्या ठरत आहेत.

 

रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयातील यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे सर्व बालकांवर उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला शक्य झाले नाही. २७, २८ आणि २९ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये मेंदू विकारावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डामधील 11 बालकांनी प्राण गमावले असून याच वेळी एनएनआयसीयू आणि जनरल वॉर्डमधील प्रत्येकी २५ मुले दगावली आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version