उसतोड कामगाराचा हा मुलगा सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास खेळत असताना शेतातील बोअरवेलमध्ये पडला होता. ११ फूट खाली अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पाच पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मुलाला रात्री उशिरा अडीच वाजेच्या दरम्यान बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश देखील आले. परंतु तोपर्यंत मुलाची प्राणज्योत मालवली होती. तब्बल साडे आठ तास हा चिमुकला बोअरवेलमध्ये अडकला होता.
कोपर्डी येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील चिडीयापुरा येथून हे कुटुंब ऊसतोडीसाठी आले आहेत. मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याचे कळताच त्याला बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या समांतर दोन जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू करण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बोअरवेल खोदण्यात आलेल्या खड्ड्यात १० फुटानंतर अचानक खडक लागला. त्यामुळे सागरला काढण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. दरम्यान NDRF च्या अथक बचावकार्यामुळे ५ वर्षीय सागरला १५ फुटी बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलंय.NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बोअरवेल खोदण्यात आलेल्या खड्ड्यात १० फुटानंतर अचानक खडक लागला. त्यामुळे सागरला काढण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. दरम्यान NDRF च्या अथक बचावकार्यामुळे ५ वर्षीय सागरला १५ फुटी बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.