जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत 2 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. इतकंच नव्हे, तर अत्याचारामुळे घाबरलेल्या मुलांनी विष घेतलं. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला. तर एका मुलाची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
मृत्यूशी झुंज देत असलेल्या या मुलानं आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. आरेच्या फिल्टरपाडा परिसरात गेले असता एका व्यक्तीनं त्यांना एका ठिकाणी नेलं. तिथं दारं-खिडक्या बंद करून अत्याचार केल्याचं या मुलानं सांगितलं.
तसंच या घाबरलेल्या पीडित मुलानं ‘वो डॉन है, आप लोग घर बेचकर गाव चले जाओ…अशी कळकळीची विनंती आपल्या पालकांना केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.