मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचे दुखणे पुन्हा बळावले असून मागील आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास सुरू झाला. तसेच त्यांच्या मणक्यातही वेदना होत होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आज सकाळी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून पुढचे काही दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सकाळी साडेसात वा.च्या सुमारास शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. तासभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच पुढेचे काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.