मुख्यमंत्री शिंदे झाले ‘डॉक्टर एकनाथ शिंदे’

मुख्यमंत्री शिंदे झाले ‘डॉक्टर एकनाथ शिंदे’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथ शिंदे झाले आहे. कारण त्यांना आता आपल्या नावापुढे डॉक्टरेटची पदवी लावता येणार आहे. त्यामुळे नुसते एकनाथ शिंदे नाही तर आता डॉक्टर एकनाथ शिंदे म्हणून त्यांची ओळख निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.

महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि नवी मुंबईच्या प्रसिद्ध डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापनातील त्यांचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेता त्यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे.

नेरुळ येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी संपन्न झाला. यावेळी राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सामाजिक, वैद्यकीय सेवा व आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच सामाजिक कार्यासाठी माजी खासदार विजय दर्डा यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट (डी. लिट) देण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version