मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी आमदारांशी संवाद

मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी आमदारांशी संवाद

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जागा सहा आणि उमेदवार सात आहेत. त्यामुळे सहाव्या जागेवरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. तर निवडणुकीसाठी पक्षनेत्यांनी कंबर कसली असून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी आमदारांशी संवाद साधणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री मंगळवारी मविआ आमदारांशी संवाद साधणार असल्यामुळे त्यांनी सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये असणार आहे.

मुख्यमंत्री मंगळवारी महाविकास आघाडीतील आमदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व आमदारांची विशेष बैठक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला काही अपक्ष आमदारही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version