मुख्यमंत्र्यांकडून गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांना अभिवादन

मुख्यमंत्र्यांकडून गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांना अभिवादन

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात सत्तांतर झाल्याने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका केली जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा युक्तिवाद करत आहेत.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो या ट्विटमध्ये पोस्ट केला आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो या ट्विटमध्ये पोस्ट केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यामुळे कलाटणी मिळाली. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागलं. एकनाथ शिंदेंना 1984 साली वयाच्या विसाव्या वर्षी शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version