Moshi Building Collapse : मुख्यमंत्र्यांनी घेतला मोशी इमारत दुर्घटनेचा आढावा; मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे प्रशासनाला दिले निर्देश

Moshi Building Collapse : मुख्यमंत्र्यांनी घेतला मोशी इमारत दुर्घटनेचा आढावा; मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे प्रशासनाला दिले निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड येथील मोशी इमारत दुर्घटनेला तीन दिवस उलटून गेले असतानाच बचावकार्य सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अजूनही आठ कामगार या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे समजते. त्यामुळे इमारतीचा ढाचा कधीही ढासळण्याची शक्यता असतानाच जवानांनी खबरदारी घेत शोधकार्य सुरू ठेवले आहे. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. तर 15 जणांना बाहेर काढण्यात जवानांना यश आले असून तीन जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. काल, शुक्रवारी मुख्यंत्र्यांची पिंपरीतील परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक पार पडली. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे. 

हेही वाचा : Bihar Politics : ‘लवकरच बिहार सरकार कोसळणार’; बांकीपूरमधील NDA च्या बैठकीदरम्यान तेज प्रताप यादव यांचा खळबळ दावा

काय म्हटले आहे पोस्टमध्ये – 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मोशी येथील दुर्घटनेबाबतचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रशासन बचावाचे काम आज रात्री पूर्ण करेल, अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. 

मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. याशिवाय, दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबतही प्रशासनाला आवश्यक निर्देश यावेळी त्यांनी दिले.

यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या दुर्घटनेला 64 तास उलटले तरी मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरुचं आहे. आता अत्याधुनिक कटरच्या मशनरीने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आला आहे. आता पहिल्या मजल्याचा स्लॅबचं पाडकाम सुरु करण्यात आले आहे. या स्लॅब खालीच अडकलेले आठ कामगार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version