Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीत लोटला जनसागर; राज्यपाल-मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरही झाले नतमस्तक

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीत लोटला जनसागर; राज्यपाल-मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरही झाले नतमस्तक

मुंबई : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री छगन भुजबळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : ‘शेतकऱ्याचा मुलगा सरकारी नोकरी मागणार नाही’ , बावनकुळे यांचे मोठे विधान

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो. एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवू शकते, हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं. बाबासाहेब यांच्या कलमाने भारताला बदलवून टाकलं. समतेचे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. महिला – पुरुष भेद संपवण्याचं काम देखील याने केले. आज भारत प्रगती करत आहे, कारण संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे. जगाच्या पाठीवर कोणत्या व्यक्तीचे जयंतीला कार्यक्रम होतात, ते बाबासाहेबांचे. हे कार्यक्रम म्हणजे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदना आहे. स्वतःचा प्रकाश जागृत करून स्वतःच्या पायावर उभे राहा, हा सर्वोत्तम संदेश त्यांनी दिला. सामाजिक चळवळीचा उल्लेख आपण नेहमी करतो, पण ते करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान मागे पडतं. भारताच्या अर्थकारणाला त्यांनी ज्या पद्धतीने दिशा दिली ती महत्त्वाची आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकमध्ये डॉक्टर पदवी मिळवली. त्यात त्यांनी प्रबंध मांडला तो महत्त्वाचा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version