Devendra Fadnavis Met Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस-संजय राऊतांची 20 मिनिटांची भेट! आशिष शेलारही बाजूला; भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

राजकारणात मोठी घडामोड घडत असल्याची माहिती समोर आली आहे.  काल रात्री उशिरा महायुती आणि मविआमधील दोन नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे.
Devendra Fadnavis Met Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस-संजय राऊतांची 20 मिनिटांची भेट! आशिष शेलारही बाजूला; भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

राजकारणात मोठी घडामोड घडत असल्याची माहिती समोर आली आहे.  काल रात्री उशिरा महायुती आणि मविआमधील दोन नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. हे दोन नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची एका खाजगी विवाह सोहळ्यात भेट झाली.

हेही वाचा- Local Body Elections in Maharashtra: नाशिक निवडणुक ‘लक्ष्मी दर्शनाने’ गाजली; पैशांची बेसुमार उधळपट्टी

त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत विचारणा करून त्यांच्या उपचाराबाबत विचारणी केली. राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात दोन्ही प्रमुख नेते एकमेकांना भेटले. यावेळी या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित आहे.

हेही वाचा- Maharashtra Election Commission: राजकीय दबावाला न जुमानता राज्य निवडणूक आयोग ठाम; ‘कायदाच अंतिम’, भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर

त्याचसोबत उद्धव ठाकरे हे देखील या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा तर लांबची गोष्ट दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट देखील घेतली नाही. राजेश नार्वेकर राज्याचे अन्न व पुरवठा सचिव आहेत आणि संजय राऊत यांचे व्याही आहेत. दरम्यान कालच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version