प्रतिनिधी, विजय चिडे
गावातील एक तरूण पोलिस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आला पण त्याचा परीक्षेदरम्यानेच मृत्यू झाला. ऐकून धक्का बसला ना? पण हो. अशी घटना घडली आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिस भरती प्रक्रिया सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय येथे लोहमार्ग पोलिस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना हा प्रकार घडला.
सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे (वय 23) हा तरुण भरतीसाठी धावण्याची चाचणी देत होता. रनिंग सुरू असताना अचानक तो मैदानात कोसळला. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला उचलून घाटी रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.