ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्याप्रकरणात छोटा राजनसह 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्याप्रकरणात छोटा राजनसह 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्याप्रकरणाबाबत आज मुंबईतील विशेष मकोका न्यायालयानं निकाल दिला आहे. पत्रकार जे. डे हत्याप्रकरण खटल्यात पत्रकार जिग्ना वोरा व पॉल्सन जोसेफची निर्दोष सुटका मिळाली असून, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह 9 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, डे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामुळे राजन अस्वस्थ होता आणि यातूनच डे यांची हत्या करण्यात आली होती. अभिजीत शिंदे, सचिन गायकवाड, निलेश शेंडगे, सतीश काल्या, अरुण डाके, अनिल वाघमोडे, दीपक सिसोदिया, मंगेश अगनावे आणि विनोद असरानी या आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून, जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version