घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असलेली दिसून येत आहे. घरात सासरच्यांकडून होणारे अत्याचार, मारहाण या सगळ्याला कंटाळून अनेक महिलांनी त्यांचं आयुष्यदेखील संपवलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर येथे घडली आहे. त्यामुळे सर्वांनाच एक मोठा धक्का बसला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती कॉलनी परिसरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जेवणात केस सापडल्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीने केलेल्या अमानुष मारहाण केली. यामध्ये संबंधित विवाहीता गंभीर जखमी झाली. सासरच्या या सततच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी छावणी पोलिसांनी मृत महिलेचा पतीसह सासरच्या सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.ईश्वरी अजय बनकर वय 25 असे मयत झालेल्या विवाहितेच नाव आहे.तर अजय बनकर 3, दिनेश बनकर 35, दिलीप बनकर, चंद्रमणी बनकर, छाया बनकर, आशिष बनकर आणि गणेश बनकर अशी आरोपींची नावे आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.