Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, गॅस एजन्सीवरच ग्राहकाने फोडून घेतलं स्वत:चं डोकं, भयंकर प्रकार उघड

Chhatrapati Sambhajinagar :  छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, गॅस एजन्सीवरच ग्राहकाने फोडून घेतलं स्वत:चं डोकं, भयंकर प्रकार उघड

सध्या एलपीजी तुटवड्याचं सावट सर्वत्र आहे. आखाती देशातील वाढत्या तणावामुळे इंधन टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे. इंधन तुटवडा नाही असं राज्य सरकारने सांगितलं असलं तरीही ग्राहकांना गॅससाठी एजन्सीबाहेर रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेपू येथे गॅस सिलेंडर न मिळाल्याने एका व्यक्तीचा संताप अनावर झाला. कमल गॅस एजन्सीसमोरच त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. 

हेही वाचा – 'कैसा हराया' म्हणणाऱ्या सहर शेख वडिलांसह 'नॉट रिचेबल'; निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय? 

बालचंद नेमाने (वय 50, रा. रांजणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चकरा मारत होते. मात्र वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले. घरी बायकोला काय सांगू? असे म्हणत त्यांनी संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा – Women Reservation Bill 2026: संसदेत महिला आरक्षणावरून रणकंदन; 'नारी शक्ती वंदन' विधेयकाचा प्रस्ताव मंजूर, उद्या होणार विधेयकावर शिक्कामोर्तब 

या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गॅस टंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version