पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी लँड झाल्याची घटना घडली आहे. नाशिकहून पुण्याकडे जात असताना खानवडी येथे ही घटना घडली. महात्मा फुले यांच्या जन्मस्थळी आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित असताना भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी वाहनांच्या पार्किंग परिसरात उतरवण्यात आले.
माहितीनुसार, कार्यक्रमस्थळी दोन हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँड होण्याच्या वेळी दुसऱ्या एका मंत्र्यांचे हेलिकॉप्टरही त्याच ठिकाणी पोहोचले. एकाच वेळी दोन हेलिकॉप्टर हेलिपॅडकडे येत असल्याने योग्य सिग्नल मिळू शकला नाही. यामुळे पायलटने परिस्थिती लक्षात घेऊन वाहन पार्किंगच्या जागेत हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला.या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि छगन भुजबळ थोडक्यात बचावले.
बातमी अपडेट होत आहे…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.