Chennai Beach Tragedy : सेल्फीने केला घात! चेन्नई बीचवर दुर्घटना, महाराष्ट्रातील 3 मुलं वाहून गेली, तरूणीचा दुर्दैवी अंत तर…

मयुरी चौधरी हिचा मृतदेह सापडला आहे, तर राज केदारी नावाच्या मुलाला सुखरुपपणे बचाव पथकाने बाहेर काढलं आहे. एका तरूणाचा शोध अद्याप सुरू आहे. 
Chennai Beach Tragedy : सेल्फीने केला घात! चेन्नई बीचवर दुर्घटना, महाराष्ट्रातील 3 मुलं वाहून गेली, तरूणीचा दुर्दैवी अंत तर…

चेन्नईमधून महाराष्ट्रासाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेन्नईमधील समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेली आहेत. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अद्याप एक तरुण बेपत्ता आहे. 

महाराष्ट्रातील हे तिन्ही मुलं चेन्नई येथील एका मोठ्या आयटी कंपनीत इंटर्नशिप करत होते.शनिवारी सुट्टी असल्याने तरुण-तरुणी चेन्नई येथील पुद्दुचेरी रोडवर असलेल्या कांथाट्टूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बीचवर फिरण्यासाठी गेली होती.

हेही वाचा – Pune News : …अन् त्या स्कार्फमुळे गमावला जीव; महिलेच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ, नेमकं काय घडलं? 

मजामस्ती केल्यानंतर ग्रुप सेल्फी घेत असताना अचानक मोठी लाट उसळल्यामुळे 26 जणांपैकी तीन मुलं समुद्रात वाहून गेली. यापैकी मयुरी चौधरी हिचा मृतदेह सापडला आहे, तर राज केदारी नावाच्या मुलाला सुखरुपपणे बचाव पथकाने बाहेर काढलं आहे. एका तरूणाचा शोध अद्याप सुरू आहे. 

हेही वाचा – Budget Session 2026: अधिवेशनापूर्वीच महाविकास आघाडी आक्रमक; चहापानावर बहिष्कार टाकत मांडला आरोपांचा पाढा 

मयुरीच्या जाण्याने सर्वत्र हळहळ
मयुरी ही चेन्नईच्या आयटी कंपनीत 15 दिवसांपूर्वीच ट्रेनी म्हणून रुजू झाली होती. तिच्या मृत्यूची बातमी काल सायंकाळी तिच्या कुटुंबीयांना म्हणजेच तिच्या भावाला मयुरीच्या मैत्रिणीकडून ही दुःखद घटना कळली. यानंतर चेन्नई पोलिसांकडून फोनद्वारे माहिती मिळाली.  मयुरी अचानक निघून गेल्याने चौधरी कुटुंबीयांसह वर्डी वाशियांवर एक दुःखाचे डोंगर कोसळलं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद 
या घटनेनंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आहेत. स्थानिक सरकारला सर्च ऑपरेशन सुरु ठेवण्यासाठी विनंती केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version