चीज कॉर्न रोल

चीज कॉर्न रोल

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

 

चीज म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते आणि पिझ्झा किंवा सॅंडवीच आठवतात. मग ते डबल चिज असेल तर उत्तमच. म्हणूनच आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चीज कॉर्न रोल. आरोग्यासाठी पौष्टिक असलेल्या कणसाच्या दाण्यांपासून तयार केलेले चीज कॉर्न रोल.

साहित्य:

 चीज – 1 वाटी

हिरवी चटणी – 2 टे. स्पून

काळीमिरी पूड – 1 टे. स्पून

साबुदाण्याचे पीठ – 1 वाटी

स्मॅश केलेला बटाटा – 1 वाटी

कॉर्न – 1 वाटी

मीठ – चवीनुसार

तेल – आवश्यकतेनुसार

 

कृती:

 प्रथम एका बाऊलमध्ये कॉर्न, चीज, हिरवी चटणी, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या.

उकडलेला बटाटा, साबुदाण्याचे पीठ आणि चवीपुरते मीठ घालुन मिश्रण मळुन घ्या. बटाट्याचे रोल करुन त्यात कॉर्नचे मिश्रण स्टफ करा आणि नंतर रोल

पीठात घोळवून तळुन घ्या. अश्याप्रकारे चीज कॉर्न रोल तयार.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version