छत्रपती शिवाजी महाराजाच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणीला स्पीड बोटच्या अपघातमुळे अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झाले असल्याने शिवस्मारक भर समुद्रात नको तर शिवस्मारक राजभवन परिसरात उभारले जावे अशी मागणी मराठा सेवा संघाने केली आहे. शिवस्मारक मुंबई येथील राजभवन येथे उभारून हा मुद्दा भावनिक न बनवता व्यवहारिक पर्याय म्हणून त्याकडे पाहावे.
स्मारक जमिनीवर असल्यास दररोज सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत उघडे राहू शकते, तिकीट दर 5-10 रुपये किंवा मोफत प्रवेश असू शकतो शिवाय अपघातही टळतील.
दैनंदिन देखभाल खर्चही शुल्लक राहील आणि सामान्यांनाही शिवस्मारक सहज पाहता येईल, स्थानिक सामान्य लोकांना रोजगार मिळेल आणि मासेमारी करणाऱ्यांच्या अडचणीही कमी होतील, असा दावा महासंघाने केला आहे.
शिवस्मारक समुद्रात उभे केल्यास अनुभव पाहता दरवर्षी सुमारे 4-5 महिने समुद्रात निर्माण होणारे लाटांचे वादळ यामुळे बंद करावे लागेल. तसेच दररोज भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजेच वेळ कमी पडेल, असा दावा महासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.