परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर हे #MeToo मोहीमेमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.
एम.जे. अकबर हे संपादक असताना त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप 6 महिला पत्रकारांनी केला आहे, त्यानंतर अकबर यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.
मात्र या आरोपांबद्दल चौकशी करावी लागेल असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटंल आहे, या आरोपांची सत्यता तपासावी लागणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
अमित शाह यांच्या या विधानामुळे अकबर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जातं आहे, सध्या अकबर नायजेरीयाच्या दौऱ्यावर आहेत.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही अकबर यांच्यावर टिका करताना, आरोप करणाऱ्या महिलेच्या धाडसाचं कौतूक केलं होतं.
बेटी बचाव पासून स्त्री सशक्तीकरणाच्या अनेक योजना सरकारने हाती घेतल्या असतांना अकबर यांच्यावरील आरोपामुळे पक्षातील जेष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत.
त्यामुळे अकबर मायदेशात परतल्यानंतर त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेवून कारवाई करण्याचा मानस भाजप नेतृत्वाचा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.