मुंबई : वेस्ट इंडिज टीम 6 डिसेंबरपासून भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीआधीच सुरक्षिततेच्या कारणामुळे टी-20 मालिकेतील सामन्यातील ठिकाणात बदल करण्यात आला आहे. मुंबईत 6 डिसेंबरला होणारा टी-20 सामना हैदराबाद येथे खेळण्यात येणार आहे. तर 11 डिसेंबरला हैदराबादला होणारा तिसरा टी-20 सामना मुंबईत खेळवला जाणार आहे.
म्हणून करण्यात आला बदल
मुंबईत 6 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी अनुयायी येतात. यामुळे मुंबईत कडेकोट बंदोबस्त असतो.
मुंबईत विडींज विरुद्ध 6 डिसेंबरला पहिला टी-20 सामना नियोजित होता. पण पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणामुळे संरक्षण देण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे 6 डिसेंबरला मुंबईतील नियोजीत सामना हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. तर 11 डिसेंबरला हैदराबादला होणारा तिसरा टी-20 सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
सुधारित टी- 20 वेळापत्रक
पहिली टी-20 – 6 डिसेंबर 2019, हैदराबाद
दुसरी टी-20 – 8 डिसेंबर 2019, तिरुअनंतपुरम
तिसरी टी-20 – 11 डिसेंबर 2019, वानखेडे स्टेडिअम, मुंबई
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.