भोगीनिमित्त रुक्मिणी मातेच्या नित्योपचारात बदल

भोगीनिमित्त रुक्मिणी मातेच्या नित्योपचारात बदल

भोगीनिमित्त पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा करण्यात आली.

शनिवारी १५ जानेवारी रोजी, भोगीनिमित्त महिलांकडून रुक्मिणी मातेला अभिषेक करण्यात आला. यानंतर मानाचा मनाला जाणारा आणि सुवासिनीचं लेणं असणारा वानवसा महिलांनी रुक्मिणी मातेस अर्पण केला आणि संक्रांतीच्या भोगी सणाची सुरुवात करण्यात आली.

सकाळपासून रुक्मिणी मातेस सुवर्ण अलंकार चढवण्यात आले होते. अशाप्रकारे, संक्रातीच्या निमित्ताने रुक्मिणी मातेच्या नित्योपचारात बदल करण्यात आले.

रुक्मिणी मातेला वानवसा अर्पण करण्यासाठी बाजारातदेखील महिलांची मोठी गर्दी होती. मंदिरात फक्त महिलांना पदस्पर्श आणि मुखदर्शन तर पुरुषांना मुखदर्शनाचा लाभ मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version