चंद्रशेखर बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

चंद्रशेखर बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. दरम्यान नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच त्यांनी ठिय्या आंदोलन करताना चंद्रशेशर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील कुही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी जे नियमात असेल ते करावे मात्र नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

मात्र, ठिय्या आंदोलनादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रखेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तसेच पोलिसांनी जे नियमात असेल ते करावे मात्र नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक

नाना पटोले यांच्या पंतप्रधान मोदींवरच्या अपमानकारक वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली आहे. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांची संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील कुही पोलीसठाण्यात नाना पटोलेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version