जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य झाल्यानंतर आता ही कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना द्यावी, यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.
कर्जमाफीच्या घोषणनेनंतर कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची महसूल आणि सहकार खात्यांच्या सचिवांसोबत बैठक झाली.
सचिवांकडून त्यांनी आकडेवारी मागवली आहे. आता हा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे.
कर्जमाफीचा फायदा धनदांडग्याचा आणि सधन शेतकऱ्यांना मिळू नये, गरजूंनाच मिळावा, अशी भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली. त्यादृष्टीनं सरकारनं पावलं उचलली
आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.