…म्हणून रस्त्यांची दुरवस्था होतेय; खड्ड्यांबाबत चंद्रकांत पाटलांचे आणखी एक विचित्र वक्तव्य

…म्हणून रस्त्यांची दुरवस्था होतेय; खड्ड्यांबाबत चंद्रकांत पाटलांचे आणखी एक विचित्र वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  

 

15 डिसेंबरपर्यँत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज नांदेडमध्ये बोलताना वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचा दावा केला आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून जवळपास 96 हजार किलोमिटरच्या रस्त्यांची कामे कामे करण्यात येणार असून, जास्तीत जास्त रस्ते सिमेंट किँक्रिटचे करण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर राज्यातील खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्यामुळे लांबणीवर गेल्याचंही पाटील यांनी सांगितले आहे. मात्र, या वाळू वाहतूकीच्या पर्यायाबाबत चंद्रकांत पाटलांनी मौन बाळगलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version