जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
कोल्हापुरात मराठा महासंघाच्यावतीनं आयोजित केलेली पहिली मराठा आमसभा पार पडली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून न्यायालयीन लढाईत सरकार कुठेच कमी पडणार नाही. अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली.
तसेच कोल्हापुरात मराठा भवन साकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मराठा समाजातील राजकीय नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मराठा भवनासाठी
लाखोंची देणगी जाहीर करण्यात आली.
या आमसभेला खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, महापौर हसीना फरास, मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.