कर्जमाफीचा सुधारीत अहवाल तयार- चंद्रकांत पाटील

कर्जमाफीचा सुधारीत अहवाल तयार- चंद्रकांत पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणारच आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीच्या मुदयावरुन महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

 

शेतकरी कर्जमाफीवर पाटील यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली अशी मागणी शिवसेनेकडून करण्याच आली. कर्जमाफीची मर्यादा 1 लाखांवरुन 2 लाख करावी अशी सूचनाही शिवसेनेनं केल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बैठकीला अनिल देसाई आणि एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version