पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई, ८ जुलै २०२३, प्रतिनिधी:अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्याचा राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं. पण त्यानंतर दुसरा अंक रंगला तो, मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यावरून नाराजीनाट्याचा. पण यावरही मार्ग काढत आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं घेतला आहे.

अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे. पुढील ४८ तासांत नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीला आठवडा उलटला असला तरीदेखील राष्ट्रवादीचे मंत्री अद्याप खात्याशिवायच आहेत.

साधारणतः आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पाव पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनीही पवारांची साथ सोडत मंत्रिपदाची शपथ घेतली. पण अजूनही मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. तसेच, शिंदे गटातील इतर काही आमदारही अद्याप मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. अजित पवारांच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रिपदाची दावे केले होते. सूत्राचा माहितीतनुसार, येत्या एक ते दोन दिवसांत पुन्हा मंत्रिपद विस्तार पार पडणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी (दादा गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या मंत्र्यांचं खातेवाटप केली जाईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version