देहू, १० जून २०२३, प्रतिनिधी : टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण देहूनगरी मग्न झाली आहे. देहूनगरीतून तुकोबांची वारी (१० जूनला) शनिवारी पुढल्या प्रवासाच्या दिशेने वाट वळवणार असून वारीचा पुढला मुक्काम हा इनामदार वाडा इथे असणार आहे.
वारकरी शनिवारी हजारोंच्या संख्येने देहूमध्ये जमलेले आहेत.पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदा पालखी सोहळ्याचे हे ३३७ वे वर्ष आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने शनिवारी वारकरी देहूला पोहोचले आहेत. सोहळ्यासाठी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात संपूर्ण देहूनगरी दुमदुमली आहे. याशिवाय येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा होऊन सायंकाळी ६.३० वाजता पालखी सोहळा मुक्काम हा इनामदार वाडा येथे होणार आहे. यानंतर मुख्य आरती होणार असून रात्री ९ वाजता कीर्तन, जागर असे कार्यक्रम होणार आहे. सोमवारी या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.