तुरुंगात असलेले छगन भुजबळ जामीन मागायला गेले अन्…

तुरुंगात असलेले छगन भुजबळ जामीन मागायला गेले अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणलीय.

भुजबळांसोबत या प्रकरणात सामील अन्य साथीदारांची सुमारे 20 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केलीय.

या प्रकरणात ईडीने एकूण 178 कोटींची संपत्ती जप्त केलीय. छगन भुजबळ उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती, मनी लांड्रिंग आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मार्च, 2016 मध्ये अटक करण्यात आली असून ते मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होणारंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version