भुजबळांचा पुढील उपचार केईएममध्ये

भुजबळांचा पुढील उपचार केईएममध्ये

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ कोठडीत आहेत. यावेळी त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे भुजबळांवर उपचार सुरु होते. अखेर त्यांना जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. परंतु भुजबळ पूर्णपणे बरे न झाल्या कारणाने त्यांना आता जे.जे मधून केईएम रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

जेजे रुग्णालयात हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी (एसपीबी) आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभाग उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोटाच्या आजारावर उपचार मिळण्यासाठी केईएम रुग्णालयाच्या हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी विभागात छगन भुजबळ यांना दाखल केले जाणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version