छगन भुजबळांच्या सुटकेसाठी मोर्चा तंत्र

छगन भुजबळांच्या सुटकेसाठी मोर्चा तंत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांची जामिनावर सुटका करण्यात यावी यासाठी येत्या 28 नोव्हेंबरला आझाद मैदानावर माळी समाजातर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

नवे पर्व , ओबीसी सर्व या संघटनेमार्फत या मोर्चाचे आयोजन केल्याचे संघटक रमेश बासरकर यांनी सांगितलंय.

भुजबळ यांच्या सुटकेसोबत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी आदी मागण्याही या मोर्चात करण्यात येणार असल्याचे ओबीसी मोर्चाचे संघटक बसरकर यांनी यावेळी सांगितलंय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version