मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हाती झाडू !

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हाती झाडू !

स्वच्छता अभियानांतर्गत आज ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये तर खुद्द CEO डॉ. नरेश गिते यांनी आज स्वतः जिल्हा परिषद कार्यालयाची स्वच्छता केली.

 

सकाळी अचानक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी हातात झाडू घेऊन जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले आणि जिल्हापरिषदेतील सर्व कार्यलयं आणि परिसराची साफसफाई केली. मुख्य कार्यकारी अधिकारीच हातात झाडू घेऊन साफसफाई करत असल्याचा पाहून इतर सर्व कर्मचारी आणि अधिकरीदेखील या स्वछता मोहिमेत सहभागी झाले.

 

कार्यलयातील थुंकलेल्या सर्व जागांची नरेश गीते यांनी स्वतः स्वछता केली. दरम्यान यापुढे कार्यलयात थुंकताना आणि घाण करत असताना सापडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील गीते यांनी यावेळी दिली. अचानक सकाळच्या सुमारास हातात मुख्य अधिकऱ्यांनीच हातात झाडू घेतल्याने सर्वांची धावपळ झाली. मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेचं कार्यालय स्वच्छ झालं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version