दीड वर्षानतंर धावली माथेरानची राणी

दीड वर्षानतंर धावली माथेरानची राणी

   जय महाराष्ट्र न्यूज, माथेरान

माथेरानची खास आकर्षण असणारी मिनीट्रेनची ट्रायल यशस्वी ठरलीय. त्यामुळे माथेरानच्या राणीला धावण्यासाठी अखेर मुहूर्त सापडलाय. अठरा महिन्यांपासून माथेरानची मिनीट्रेन बंद होती. दरम्यान, पाच कोच आणि दोन इंजिनसह मिनी ट्रेनची ट्रायल घेण्यात आली. नेरळ ते माथेरान आमन लॉज या दरम्यान मिनी ट्रेनची ट्रायल घेण्यात आली.

गेल्यावर्षी मे महिन्यात मिनीट्रेनचे दोन डब्बे रुळावरून घसरल्यानंतर ही सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. यानंतर ही सेवा सुरू व्हावी, याकरिता शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version