मध्य रेल्वेच्या लोकल डब्याला भीषण आग

मध्य रेल्वेच्या लोकल डब्याला भीषण आग

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लोकलच्या डब्यांना आग लागली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडलीय. अग्निशमन दलाला या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत लोकलचा एक डबा पूर्णतः जळून खाक झाला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरुन आलेल्या 12 डब्यांच्या लोकलमधील डबा क्रमांक 2010 बी मोटर कोचला भीषण आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाची 4 फायर वाहने, 2 वॉटर टँकर, 1 रेस्क्यू वाहन तातडीनं दाखल झाले होते. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version