केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी…

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्रसरकारने तूरडाळ, मुगडाळ, उडीद यांसारख्या डांळींवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल.

गेल्या 2 वर्षात डाळींचे देशातील उत्पन्न 200 लाख टन इतके झाले आहे. गेल्या वर्षात तूरडाळीचे उत्पन्न 7 ते 8 लाख टनवरून 12 ते 15 लाख टन पर्यंत वाढले आहे. तसेच मुगडाळीचे उत्पन्न  20 ते 22 लाख टन झाले आहे.

तुरडाळीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने 4200 रु. हमीभाव जाहीर केला. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांकडून तूर उत्पन्नाला तीव्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version