दिल्लीत दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

दिल्लीत दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रेदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये  होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशातील वाढती कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोग नवी नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच यावेळी विधानसभा निवडणूक फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच निवडणूक संपण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद होणार असून पत्रकार परिषदेमध्ये पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version