केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल !

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल !

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल तसेच विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 2 सप्टेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला जाईल. मंत्रिमंडळ फेरबदलाचा मार्ग मोकळा

करण्यासाठी मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच राजीनाम्याचं सत्र सुरुच आहे. अमित शाह आणि मोदींमध्ये शुक्रवारी मोठी चर्चा झाली होती. त्याआधीच काही मंत्र्यांनी

आपले राजीनामे सोपवले असून 6 मंत्र्यांचा यात समावेश आहे.

 

कृषि राज्यमंत्री संजीव बल्यान, कौशल्य विकासमंत्री राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी, आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते या मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आला. केंद्रीय जल संधारण

मंत्री उमा भारती यांनी आरोग्याच्या कारणाने राजीनामा दिला आहे. तसेच मनुष्यबळ विकास राज्यमंत्री महेंद्र पांडे यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने ते राजीनामा देणार आहेत. लघु

आणि मध्यम उद्योगमंत्री असलेले कलराज मिश्रा हे वय झाल्याने राजीनामा देऊन राज्यपाल होण्याचा मार्ग निवडणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version