डीएसकेंवरील वाईट दिवस; राहत्या बंगल्याचा लिलाव

डीएसकेंवरील वाईट दिवस; राहत्या बंगल्याचा लिलाव

जय महाराष्ट्र न्यूज, पूणे

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्या अडचणी थांबण्याच नाव घेत नाहीत. गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी डीएस कुलकर्णी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. घेतलेलं कर्ज परत न केल्यामुळे डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून लिलाव करण्यात येणार आहे. 8 मार्चला हा लिलाव होणार आहे.

या बंगल्याची बेस प्राईस 66 कोटी 39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बँकेकडून या लिलावाची पेपरला जाहिरात देण्यात आली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडी लगत हा आलिशान बंगला असून टेकडीवरील नैसर्गिक धबधबा डीएसकेंच्या या बंगल्यामध्ये येतो.

डीएसकेंवर गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत येताच ते पाय घसरुन पडल्याने त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासांठी दीखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version