कांदा प्रश्नावर केंद्र – राज्यात असमन्वय?

कांदा प्रश्नावर केंद्र – राज्यात असमन्वय?

केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवून तब्बल ४० टक्क्यांवर नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले. सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घट होणार आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समितीच्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहे.

याच कारणामुळे कांदा प्रश्नावरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. कारण निर्यात शुल्कामुळे कांद्याचे दर पडायला सुरवात झाली आहे, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. तर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा प्रश्न या निमित्ताने उपस्तिथ झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version