जागतिक आदिवासी दिन साजरा

जागतिक आदिवासी दिन साजरा

मुंबई, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागाठाणे विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी बुधवारी कांदिवली पूर्व ठाकूर विलेज येथील मनोरंजन मैदानात जागतिक आदिवासी दिन साजरा केला. यावेळी सर्व आदिवासीयांनी पारंपारिक वेशभूषा धारण करून तसेच पारंपारिक वाद्य वाजवून तारपा, वारली नृत्य आणि आदिवासी गाणी गाऊन साजरा केला.

यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी नृत्य करून सहभाग घेतला आणि सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मागाठाने विधानसभेतील सर्व आदिवासीयांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी आणि शौचालय या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सर्व सोयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क आणि बैठक घेऊन उपलब्ध करून देणार असे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आश्वासित केले. याप्रसंगी शिवसेनेचे शाखा क्रमांक २६ शाखाप्रमुख सचिन केळकर,मच्छिंद्र वैजल, सुनील सोंबडे, बाबू सावर, दिलीप ठाकूर, उपशाखाप्रमुख योगेश बांद्रे, कपिल जैन तसेच आदिवासी संयोजक उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version