देशभरात भाजपच्या विजयाचा जल्लोश

देशभरात भाजपच्या विजयाचा जल्लोश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला होता. भाजपनं या दोन्ही राज्यात बाजी मारली आहे. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपसमोर तगडं आव्हान दिल्यामुळे अटीतटीचा सामना गुजरातमध्ये पहायला मिळाला.

 

गुजरातमध्ये भाजपला 99, काँग्रेस77, राष्ट्रवादी काँग्रेस 1, आणि अन्य 2 अशा जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधानांचा बालेकिल्ला असलेली गुजरात निवडणूक ही 2019 ची सेमी फायनल मानली जात होती. मात्र, भाजपनं निवडणूक जिंकल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोश साजरा केला.

 

दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नावाच्या जयघोषानं भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. तर, मुंबईत भाजपचे शहर अध्यक्ष अशिष शेलार यांनी चक्क ढोल वाजवून भाजपचा विजय साजरा केलाय. गुजरात आणि पुण्यात देखील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयाचा आनंदोत्सव साजरा केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version