जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
संपूर्ण देशात रक्षाबंधन सण साजरा केला जात असतांना अहमदनगरमध्ये आगळं-वेगळं रक्षाबंधन साजरा केला.
जानकीबाई आपटे मूक बधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थीनींनी अहमदनगर जिल्हा कारागृहामधील बंदीवासात असलेल्या बंदीवानांना राख्या बांधल्या. यावेळी बंदीवानांना आश्रू अनावर झाले होते. या हा कार्यक्रम कारागृहाचे प्रभारी अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.